भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
आज जिल्हा परिषद शाळा -ओझरखेड येथे 72 वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय SMC अध्यक्षा सौ.दुगाताई गायकवाड यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण केले. ध्वजारोहनानंतर संगीतमय वातावरणात राष्ट्रगीत व ध्वज गीत सादर करण्यात आले. कु. दिपाली भीमराव पगारे या विद्यार्थीनीने स्वातंत्र्य दिन निमित्त सुरेख भाषण केले.
दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायत ओझरखेड मार्फत सर्व वर्ग खोलीना लाईट फिटिंग करण्यात आली त्याबद्दल सरपंच मा.श्री.गंगाधरजी निखाडे, उपसरपंच श्री.परशराम गांगोडे, ग्रामसेवक श्री.माळोदे भाऊसाहेब यांचे श्रीफळ व पुष्प देऊन आभार मानले.
आजच्या राष्ट्रीय कार्यक्रमास नाशिक येथील "प्रोफेशनल पीपल फोरम" चे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी ओझरखेड शाळेस 7 फॅन भेट म्हणून सुपूर्द केलेत. शाळा व विद्यार्थ्यांचा विकास विषयी असलेली तळमळ तसेच सामाजिक बांधिलकी व सामाजिक ऋण व्यक्त करून आमच्या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य निर्माण केले.तसेच या टीमने सर्व मुलांना शाळेत खाऊ वाटप केल्याने विद्यार्थी विशेष खूष झाले.
फोरमच्या या सामाजिक कार्याचे संपूर्ण गावाने कौतुक केले.
ओझरखेड गावचे सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील,तंटामुक्त गाव अध्यक्ष,smc अध्यक्षा यांनी प्रोफेशनल पीपल फोरम टीमचे श्रीफळ, पुष्प देऊन आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.भोये सर,पदवीधर शिक्षक श्री.भोये सर,श्री.पाटोळे सर, उपशिक्षक सौ.तरळेकर मॅडम, श्रीम.बागुल मॅडम, श्रीम.वलंगे मॅडम यांनी परिश्रम घेतले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. राऊत सर यांनी केले.

No comments:
Post a Comment