ATM संमेलन

अविस्मरणीय शिक्षण सोहळा.....!

चौथे राज्यस्तरीय ATM शिक्षण संमेलन 2019 नाशिक

  श्री प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीतील महाराष्ट्राची शान असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महाराष्ट्रातील कृतिशील शिक्षकांचे चौथे राज्यस्तरीय शिक्षण संमेलन दि. 24 व 25 मे 2019 रोजी आयोजित करण्यात आले होते.संमेलनाचा हा सोहळा ठरला - आनंदाचा,सन्मानाचा, प्रेरणेचा व समृद्धीचा....!

विद्यार्थी व शाळा यांच्या माध्यमातून समाज तथा राष्ट्र विकास साधण्यासाठी नि:स्वार्थीपणे व अविरतपणे धडपडणारे त्रिदेव - विक्रम दादा, नारायण दादा आणि ज्ञानदा यांनी महाराष्ट्रातील तमाम  शिक्षकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत या ATM परिवाराची निर्मिती करून वटवृक्षासारखी विशाल शैक्षणिक चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या राष्ट्रीय कार्यास माझा सलाम..! आणि ज्ञानवाहक अशा या परिवाराचा मी सदस्य झालो आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

ATM महाराष्ट्र राज्य समूहाचे संयोजक विक्रम दादांचे करारी पण शिस्तप्रिय नेतृत्व, या नेतृत्वाला साथ देणारे नारायण दादा, ज्योतीताई आणि त्यांच्या पाठीशी उभी असणारी सावली म्हणजे माऊली. आपल्या कर्तव्याविषयी एकनिष्ठ राहून बालकांचे भवितव्य घडविणार्‍या ध्येयवेड्या अवलियांना तथा कृतिशील शिक्षकांना ज्ञानगंगोत्री चे पवित्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. We are one,  All Time Motivation,  समाज व शिक्षक हिताय,  प्रेरणा द्या ...प्रेरणा घ्या,  सोबतीने समृद्ध होऊयात, एक विचार... एक परिवार अशा अनेक ध्येयवाक्यांनी प्रभावीत करून या सर्वांची मोट बांधण्याचे कार्य या उभयतांनी केले. तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांना 'लिहीते होऊ या'..! या संदेशाद्वारे शाळेत राबविलेल्या उपक्रमाचे लेखन करून संबंध महाराष्ट्रभर पोचविण्याचे महान कार्य करण्यासाठी आपणा सर्वांना प्रेरित करून उद्युक्त केलं. यासाठी ATM ची स्वतंत्र वेबसाइट लॉन्च केली. निशुल्क पब्लिकेशन सुरू केले. साहित्य संमेलन सुरू केलं. वार्षिक ई अंकाचे प्रकाशन सुरू केले आणि आता इंग्रजी सुधार उपक्रम, विज्ञान साहित्य निर्मिती, सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन इत्यादी उपक्रम राबविण्याचे नियोजन होत आहे.

'कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन' ! .... या गीतेतील श्लोकानुसार आपल्या ATM संयोजकांनी आपल्या बांधवांना प्रेरित करून समृद्ध बनविणे हे कर्तव्य मानले आणि या कर्तव्यालाच कर्म समजून कार्य करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या श्रेयाची, फळाची त्यांना आसक्ती नाही म्हणून त्यांचे हे कार्य खूप गौरवास्पद आहे.

ATM च्या कार्याचे उत्तम उदाहरण म्हणजे याचि देही...याचि डोळा अनुभवलेले नाशिक नगरीतील चौथे शिक्षण संमेलन.....

 या संमेलनाच्या आयोजनाचे मानकरी जरी ATM नाशिक होते तरी पण काळजीपोटी याचे कर्ता-करविता होते... विक्रम दादा व सहकारी. एक महिन्यापूर्वी पासून दररोज मार्गदर्शकाच्या भूमिकेतून अपडेट्स देत होते आणि घेत होते. संमेलनाच्या नियोजनातील प्रत्येक गोष्ट सर्वोत्तमच्या कसोटीवर पडताळून पाहत होते. अगदी बारीक-सारीक गोष्ट नेत्रपटलातून सुटू नये हा त्यांचा कयास होता. प्रत्येक वेळी नाशिकला येऊन नियोजन करणे त्यांना शक्य होणार नव्हते करिता प्रतिनिधी म्हणून हेमंत दाजी व मोनाताई यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि नाशिकरांनीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नियोजन व आयोजन पूर्णत्वास नेले.

नियोजन व्यवस्था झाल्यानंतर या दोन दिवसीय संमेलनात ATM बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी खालीलप्रमाणे  एकशे बढकर एक अशा विविध विषयातील तज्ञ व अधिकारी यांना आमंत्रित केले.

1.  डॉ.ई. वायुनंदन , कुलगुरू  य.च.म.मु.विद्यापीठ नाशिक
2.  मा. प्राची साठे , कार्यासन अधिकारी, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
3. मा.भरत मोघे,विभागीय माहिती उपसंचालक,नाशिक 
4. डॉ.हितेश पानेरी, समुपदेशक, सीसीआरटी , नवी दिल्ली.
5. मा.मॅक्सिन बर्नसन (मावशी)
6. डॉ. प्रकाश आतकरे उपकुल सचिव 7.सहयोगी प्राध्यापक पाईकराव सर
8.डॉ. कविता साळुंखे, ज्येष्ठ व्याख्याता   9.डॉ. वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक
10.डॉ. विशाल तायडे, बालसाहित्यकार, औरंगाबाद 
11.मा. सूर्यवंशी साहेब, प्राचार्य डायट नगर 
12.मा. सुलभा वठारे, गटशिक्षणाधिकारी पंढरपूर 
13.मा.ज्योतीताई बेलवले, राष्ट्रीय आदर्श शिक्षिका
14.मा.बाळासाहेब लिंबिकाई
       
         यांनी केलेले मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी व उपयुक्त ठरले.

तसेच ATM बांधवांना प्रेरित करण्यासाठी, त्यांना अनुभव समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील उत्तम शैक्षणिक कार्य करणाऱ्या खालीलप्रमाणे हिऱ्यांना सामोरे आणले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केलेले गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य त्यांच्याच शब्दातून ऐकण्यास मिळाले हे आम्हा सर्वांचे भाग्य. त्यांचे अनुभव ऐकताना डोळे पाणावले. सभागृह अवाक झाले. शांतता पसरली. पण याच अवलियांनी 'तुम्ही वाईट नका वाटुन घेऊ' असा धीर देऊन उपस्थितांचे मने जिंकली. काहींनी गंभीर झालेल्या सभागृहाला 'अवघड कार्य कसे सोपे केले' याचा अनुभव विनोदबुद्धीने व्यक्त करून हसविले.

     माझा प्रेरणादायी प्रवास
श्री. सुरेश धारराव
श्री. राहुल भोसले
श्री. सोपान खैरनार
     माझा वेगळा उपक्रम
श्री. वेच्या गावित
श्री. जगदीश कुडे
श्री. प्रदीप देवरे
श्री. तुकाराम अडसूळ
श्री. लक्ष्मीकांत पडलवार
श्री. सारिका पूजा पाटील
श्री. वाल्मीक चव्हाण
     उपक्रमशील शाळा
श्री. संदीप पवार
श्री. लहू बोराडे
श्री. किरण गायकवाड
श्री. सचिन सूर्यवंशी
श्री. संदीप शेजवळ

संमेलनातील अविस्मरणीय घटना

1.निसर्गरम्य परिसरात संमेलनाचे आयोजन.
2. प्रतिभाशाली उद्घाटक, अतिथी, मार्गदर्शक, व्याख्याते, विषयतज्ञ यांची उपस्थिती व त्यांच्याशी साधलेला संवाद.
3. नाष्टा व सुग्रास भोजनाचा घेतलेला मनमुराद आनंद व त्याची व्यवस्था करणारे हेमंत दाजी.
4. कवी कट्टातील हंसराज भैय्याचे बहारदार सूत्रसंचालन, राहुल भोसले सरांचा सुमधूर आवाज व कवींनी सादर केलेल्या श्रवणीय कविता.
5.आदर्श प्रशासक डॉ.ई.वायुनंदन यांच्या समवेत केलेले मॉर्निंग वॉक.
6.एका परदेशी व्यक्तीने भारतातील प्रदेशात येऊन मातृभाषेचे अधोरेखित केलेले महत्व व त्यासाठी अविरतपणे चालू असलेले कार्य.
7.ATM च्या शैक्षणिक चळवळीने प्रभावित होऊन संमेलनाचे शुल्क माफ करणारे डॉ.ई. वायुनंदन यांच्या संवेदनशील व दिलदार व्यक्तिमत्वाची ओळख
8.माझा वेगळा उपक्रम,उपक्रमशील शाळा, माझा प्रेरणादायी प्रवास शब्दातीत करणारे हिरे.
9.प्रकाश दादा, विलास बापू ,जयदीप दादा,गजूदादा यांनी सांभाळलेली सुत्रसंचालनाची धुरा व इतरांनाही दिलेली संधी.
10.खंडू दादा, नामा दादा, भरत दादा यांनी प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये टिपून लाईव्ह अपडेट देण्याचे कलेले महत्तम कार्य.
11.शिंदे सर, जमदाडे सर, खंडू दादा यांनी संमेलनपूर्व व संमेलनोत्तर ची प्रसिद्धी महाराष्ट्रभर पोचविण्याचे केलेले अतुलनीय कार्य.
12.नारायण दादा, माऊली, गजू दादा यांनी दोन्ही दिवसाच्या व्यवस्थेसाठी दिलेला खडा पहारा.
13.सेल्फी पॉइंट ची निर्मिती हे खास ठरलेले आकर्षण.
14.अनुराधा मॅडम, सविता मॅडम, मोना ताई यांनी सादर केलेले सुमधुर स्वागत गीत.
15.ATM बांधवांनी केलेले साहित्य प्रकाशन व प्रकाश दादाचे इंग्रजी अॅपचे लाॅचिंग.
16.मा.प्राची साठे मॅडम यांची विक्रमदा व ज्योतीताईंनी घेतलेली उपयुक्त व दिलखुलास मुलाखत.
17.राज्यातील ATM सदस्यांच्या झालेल्या भेटी-गाठी.

      या सर्व अविस्मरणीय गोष्टींनी आम्ही खूपच प्रभावी झालोत.

या संमेलनातून ध्यास विकासाचा, नवनिर्मितीचा, व्यापक व सकारात्मक दृष्टिकोन,नवीन कौशल्य, नवीन जिद्द, चिकाटी, सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता,या सर्वांची शिदोरी या संमेलनातून मिळाली. हीच शिदोरी आपल्या चिमुकल्यांना देण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊयात.

    संमेलनाच्या सर्व आठवणींची साठवण करून अतुरता असेल आता पुढील संमेलनाची..........!













श्री.विश्वास पाटोळे
ATM परिवार नाशिक
दिनांक : 24 व 25 मे 2019 

No comments:

Post a Comment