वाट यशाची.....
कधीकधी
सुसाट वेगाने
गाठावा
इच्छीत पल्ला.....
पण
नसूनही अपेक्षित
होतो
नियतीचा हल्ला....
शिकावयास मिळते सत्य
असतो मजसाठी
सल्ला...
आहे जाणूनी निजकर्म
बनणे आहे
कुलकल्ला....
लावूनी निधड्या
छातीशी
तडकसार कार्याचा
बिल्ला....
निर्माण करुनी
नवचैतन्य
गाठवया यशाचा किल्ला...
✍ विश्वास पाटोळे, नाशिक
------------------------------------------------------------------------------------------
होऊ या तयार.....
लढावया सज्ज हो तू
आहेस भविष्याचा सरदार
तूच आहेस नव्या इतिहासाचा
नव्या आयुष्याचा शिल्पकार
दुष्ट विचार चक्राच्या गर्तेतून
करा आपली नौका हद्पार
कठीण प्रसंगी या सम
कसा होईल योग्य उपचार.....1
तूच आहेस......शिल्पकार
आपल्या चुकांमुळे
दाखविला
सृष्टीने अद्भुत चमत्कार
नित्यनेमाचे वर्तनच आपुले
ठरले केवळ स्वैराचार
निसर्गाच्या विरोधी जाणारे
आता तरी व्हा समजदार
अबाल-वृध्दांसह व्हा सावध
नीतिमूल्यासह रूजवा सुविचार.....2
तूच आहेस......शिल्पकार
आरोग्याच्या स्वच्छ सुंदर
सवयींचा करा अंगिकार
ठेवूनी योग्य सामाजिक अंतर
करा जीवनावश्यक व्यवहार
स्वतःच घ्या करून बंदिस्त
सांभाळा आपला परिवार
सामना आरोग्य आणीबाणीचा
करण्यास होऊ या सारे तयार.....3
तूच आहेस......शिल्पकार
✍ विश्वास पाटोळे, नाशिक
|
ज्ञान, मनोरंजन,आनंदासह त्वरेने साधला जातो जगाशी संपर्क
सूर्योदयापासून निद्रस्थ होईपर्यंत होतो तुम्ही-आम्ही स्वईच्छेने गर्क
फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, टिकटॉक चे असतात सर्वच पाईक
अशा सोशल मिडियावर हवा हवासा शब्द असतो तो म्हणजे like
सर्वांची इच्छा असते सर्वांच्या सोबतीने समृद्ध होण्याची
म्हणून धडपड असते सोशल मिडियावर पोस्ट करण्याची
अपेक्षा असते like द्वारा अनेकांकडून प्रोत्साहन मिळण्याची
कारण like मुळेच मिळते उर्जा जोमाने कार्य करण्याची
कधीकधी मन, भावना, दृष्टीकोन नसेल जुळत पोस्टमधून
like करणारे like करतात मात्र आपलेच हितसंबंध जोपासून
विषय जरी असला साधा तरी भारीच असल्याचे सांगणार
प्रसंगी अनोळखींच्या चांगल्या पोस्टकडे मात्र दुर्लक्ष करणार
आप्तेष्टांचा पडला नुसता फोटो तरी होतात खुलून व्यक्त
नानाविध उपमांचा वापर करुन like करतात मनसोक्त
आपल्याहून पुढे असणाऱ्यांना आठवणीने करतात follow
आपल्याहून मागे असणाऱ्यांना मात्र करतात Unfollow
श्री. विश्वास पाटोळे
नाशिक
8007974560

No comments:
Post a Comment