गरज आहे, मराठी भाषा संवर्धनाची....!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकता मराठी...
धर्म, पंथ, जात, एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी..
कवी सुरेश भट यांनी वरील कवितेच्या ओळीतून मराठी भाषेचे सत्य आणि महत्व विषद केले आहे. पण या सत्याला आणि महत्त्वाला आपण किती महत्व देतो याविषयी संशोधन करण्याची वेळ सद्यस्थितीत आपल्यावर येऊन ठेपली आहे. मराठी भाषेच्या इतिहासात डोकावल्यावर देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाल्याचे नमूद केलेले आढळते. मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व बोलीभाषा म्हणून किमान सातशे वर्ष सातत्याने वापरात आहे. मराठी भाषकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना होऊनही आज साठ वर्ष होत आले पण मराठी भाषेच्या विकासाला व संवर्धनाला हवी तशी गती व दिशा मिळालेली वाटत नाही.
इंग्रजी भाषाचे आकर्षण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होते की काय अशी भीती सातत्याने व्यक्त केली जाते. खरेतर मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. विविध ज्ञानशाखांमधील ज्ञान आज मराठीत येत आहे. मोबाईल व संगणकीय तंत्रज्ञानही मराठीत उपलब्ध होत आहे तरीही मराठी भाषा संवर्धनात आपण मागे पडत चाललो की काय असे वाटते.
म्हणून मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी खालीलप्रमाणे महत्त्वाची उपायोजना करणे आवश्यक वाटते. गरज आहे स्वतःपासून सूरवात
करण्याची...
1) आपल्याला सगळ्यांनाच आपली मातृभाषा अगदी बालपणापासून अवगत असते, पण काळाच्या दोघात आपल्याला अवगत असलेल्या भाषेचा विकास करण्याकडे आपले दुर्लक्ष होते. खरेतर भाषा विकसन ही प्रक्रिया काळासोबतच निरंतन प्रवाही रहाणारी प्रक्रिया आहे. ही प्रवाही साधना स्वतः करीत रहाणे ही काळाची गरज आहे. यामुळे भाषा विकासाबरोबर भाषासंवर्धन ही होईल.
2) व्यक्तीच्या जीवनात भाषा विकास ही वेगवेगळ्या वयोगटात आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर होत असते. या प्रत्येक टप्प्यावर माणसाला आपल्या भाषेचा झालेला विकास, आपल्या व्यवहारावर असणारा भाषेचा प्रभाव पडताळून पाहणेसाठी नित्य श्रवणातून बहुश्रुतता, नित्य वाचनातून चिंतन व मनन, शंकांसाठी चर्चा करणे. चिंतन मननातून लेखन करणे, अभिव्यक्त होणे गरजेचे आहे.यावरून भाषा संवर्धनात आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याची स्वतःला निश्चिंत जाणीव होईल.
3) मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड नाहीसा करणे हे प्रत्येकाने कर्तव्य समजावे. प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीने मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगून तिची जोपासना व संवर्धनसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे.
4) प्रत्येकाने मातृभाषेतच संवाद साधणे आवश्यक आहे. आपल्या भूमीची भाषा ही जगातील भाषांपैकी एक भाषा आहे. आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो या आत्मविश्वासाने ती बोलण्याची आवश्यकता आहे.
5) मराठी भाषेत अनेक बोलीभाषा आहेत.उदा.अहिराणी, वऱ्हाडी, कोकणी.यासारख्या प्रत्येक बोलीभाषेचा विकास करून त्यांच्यात साहित्यनिर्मिती करणे त्या साहित्याचा प्रसार करणे.
6) आपली मातृभाषा मराठी असूनही प्राथमिक स्तरापासूनच्या शिक्षणात प्रथम भाषा म्हणून मराठी ह्या विषयाचा समावेश केलेला आहे. त्याचे कारण हेच आहे की मराठी भाषाचे संपूर्ण ज्ञान व्हावे.मराठीतील काही शब्दांचे अर्थ मराठी व्यक्तींना माहित नसतात. मग आपण त्या शब्दांना कठीण शब्द संबोधून आपल्या अज्ञानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून भाषेचे सौंदर्य, शुद्धलेखन,व्याकरण याचे जाणीवपूर्वक ज्ञान सर्वांनी घेणे आवश्यक आहे.
7) आजकाल गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालक आकर्षिला जात आहे. खरेतर हेच पालक मराठी शाळेत शिक्षण घेऊन आज उच्च पदांवर कार्यरत आहेत तरीही त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिक्षण मिळावे यासाठी अट्टाहास करतात. शिवाय आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी शाळा फी च्या माध्यमातून प्रचंड पैसा त्या शाळांना देतात.किती विरोधाभास आणि किती दुटप्पी भूमिका...! यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पटसंख्येचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे ही आधुनिक काळाची गरज आहे. नक्कीच... ज्ञानभाषा म्हणून तिचे शिक्षण घ्या परंतु त्यासाठी मराठीची कास का सोडावी हे पटत नाही. पण सध्या गरज आहे समतोल राखण्याची....! प्रत्येक इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिलीपासून दर्जेदार मराठी शिकवण्याची ! आणि मराठी माध्यमांच्या शाळेत पहिलीपासून दर्जेदार इंग्रजी शिकविण्याची!
8) जनसंपर्काचे माध्यम मराठी भाषा हवी. विविध कंपन्यांच्या जाहिराती, माहितीपत्रके, सूचनापत्र हे मराठी भाषेतच प्रसिद्ध व्हायला हवेत.
9) वेब, ब्लॉग यांची निर्मिती मराठी भाषेत होणे गरजेचे आहे. तशी सुविधा संगणकीय प्रणालीत उपलब्ध आहे. यामुळे इंटरनेटच्या महाजालावर सर्च इंजिनच्या सहाय्याने आपल्याला हवी ती माहिती मराठी भाषेत मिळू शकेल.
10) जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली लेखन साहित्य हे इंग्रजी भाषेत आहे. या साहित्याचे मराठी भाषेत भाषांतर करण्याची जबाबदारी आपल्या साहित्य मंडळाने तथा संबंधित संस्थानी स्वीकारणे आवश्यक आहे.
11) महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. प्रशासनात राजभाषा वापरणे आवश्यक केले आहे, तरीही इंग्रजी भाषेचा सर्रास वापर होत आहे.यात खरी गंमत अशी की प्रमुख उच्चस्तरीय अधिकारी यांनाच मराठी भाषेची अडचण असते. देश पातळीवरून त्यांच्या नियुक्या तसेच बदल्या होत असतात.त्यांच्याही मातृभाषेची कदर करणे आपले कर्तव्य समजावे. बरं हा मुद्दा आपण समजू घेऊ शकतो. पण महाराष्ट्रील जनतेचे काय ?.आजही राज्यस्तरीय न्यायालयीन कामकाज मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेतच सूरू आहे. पण किमान संबधित अभिलेखांचे अनुवाद निशुल्कासह करून मिळण्यासाठी वादी-प्रतिवादींनी आग्रह धरला पाहिजे.खरेतर न मागता मिळायला हवे. तसेच शासनानेही यावर योग्य उपाययोजना करावी जेणेकरून प्रशासनात मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन मिळेल.
12) इंग्रजी भाषेची अडचण आल्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांना उपयुक्त तसेच जीवनावश्यक शिक्षण घेता येत नाही. उच्चस्तरीय शिक्षण हे बऱ्याच प्रमाणात इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे.यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना तेही शिक्षण घेणे शक्य होत नाही.विविध विषयांचे आकलन व अभिव्यक्ती मातृभाषेतून जेवढी होईल तितकी इतर भाषा माध्यमातून होत नसते हे सत्य आहे. म्हणून शासनाने सर्व प्रकारचे उच्च शिक्षण मराठी भाषा माध्यमांमध्येही उपलब्ध करून देण्यास भाग पाडावे.
13) सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. संपर्क साधने, दूरदर्शन, संगणक, फॅक्स, ई-मेल इत्यादी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. या साधनाचा उपयोग मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी करायला हवा.
14) मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी जागतिक परिषदा, देश पातळीपासून ते तालुकापातळीपर्यंत साहित्य संमेलने आयोजित करण्याचे महत्वपूर्ण कार्य मराठी भाषा संस्थांनी करणे आवश्यक आहे. मराठी भाषा संवर्धन ही एक "चळवळ" निर्माण करून प्रत्येकाने आपल्या माय मराठीचे ऋण फेडण्यासाठी सहभागी व्हावे.
जय मराठी...जय महाराष्ट्र
विश्वास राघो पाटोळे, पंचवटी, नाशिक
दिनांक : 27 फेब्रुवारी 2019

No comments:
Post a Comment