ओझरखेडला लेकीच्या सन्मानार्थ घरावर नावाची पाटी....
दिंडोरी, ता.3: जिल्हा परिषद ओझरखेड शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिनानिमित्त "करूया सन्मान लेकीचा" या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
प्रारंभी ढोल-ताशांच्या गजरात गावातून मुलींच्या सन्मानार्थ फेरी काढण्यात आली. फेरी दरम्यान 'लेक वाचवा, लेक शिकवा', 'मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण', 'शिकलेली आई, घर पुढे नेई', अशा घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून निघाला.
रोजच सुंदर दिसणारी लेक आज सावित्री होऊन दारी अवतरली ती स्वतःच्या नावाची पाटी घेऊन. यावेळी पालकांनी लेकीचे औक्षण केले. त्यांच्या नावाची पाटी दारावर लावून आनंदोत्सव साजरा केला.आजच्या आश्चर्यकारक व सुखद अनुभूतीने आईंचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदच्या विद्यमाने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पोपट भोये व पदवीधर शिक्षक विश्वास पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment