अचानक भरवलेली गणित कार्यशाळा...
नाशिक जिल्ह्याचे गणित मित्र आदरणीय वाल्मिक चव्हाण सर आज अचानक ओझरखेड शाळेत आले. सरांना बघून आश्चर्याचा धक्काच बसला. काही बोलण्याच्या आत चव्हाण सर म्हणाले, "सकाळी तुमच्या शाळेची बातमी वाचलेली होती. सुरगाणा येथे सुरु असलेल्या निष्ठा प्रशिक्षणास जात असताना मनात विचार आला की, आपले सर्वांचे अभिनंदन करावे म्हणून आलो. खरे तर या शाळेत गणित चळवळ सुरू करण्यासाठी मला यायचं होतं. आज योगायोगाने येथे येण्याचा योग जुळून आला." आम्हालाही आनंद झाला कारण चव्हाण सरांना मी याआधी शाळेत येण्यासाठी विनंती केली होती. सरांना दोन मिनिटांसाठी ऑफिसात बसण्यास सांगितले पण सरांनी तिथे बसण्यापेक्षा वर्गात जाऊ असे सूचविले.त्यांचा उत्साह पाहून मी विनंती केली की, एकाच वर्गात जाण्यापेक्षा सर्वांना मैदानात बोलावू का? त्यांचा होकार येताच काही मिनिटातच मैदानात आसनव्यवस्था केली. आणि सुरू झाली चिमुकल्यांची गणित कार्यशाळा.....
मण्यांची माळ सामोरे ठेवून ज्ञानरचनावाद पद्धतीने पुर्वानुभवांची सांगड प्रात्यक्षिकांची जोडून एकक, दशक पासून ते पाच अंकी संख्या गणनपर्यंत ज्ञानाची निर्मिती किती सहजतेने करून घेतली हे अर्ध्या तासात विद्यार्थ्यांना ही कळले नाही. या अध्ययन-अनुभूतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मिळवला.
विशेष...
यावेळी विचारलेल्या प्रश्नांची जास्त वेळा अचूक उत्तर देणारी इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी गुंजन हिला गणित मित्र म्हणून घोषित करून तिचे अभिनंदन केले. स्वत:चा 'गणित मित्र' बॅज सरांकडून तिला देण्यात आला.यामुळे चिमुकली खूपच भारावली.
यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसमवेत तीनच्या पाढ्यावर आधारित एक आनंददायी मोकळीका सादर केली, ज्यामुळे विद्यार्थी खूप आनंदी झालेत. अवघड वाटणारा गणित विषय सोपा असल्याचा अनुभव यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.
या शाळेत गणित चळवळ उभारण्याचा मानस चव्हाण सरांनी व्यक्त केला ज्यास विद्यार्थ्यांनी होकार देऊन पुन्हा येण्याचा आग्रह धरत सरांचा होकार मिळवला.
आमच्या शाळेतील चिमुकल्यांसाठी सरांनी दिलेली भेट निश्चित प्रेरणादायी ठरली आहे. करिता चव्हाण सरांचे मनःपूर्वक आभार.
विश्वास पाटोळे
शाळा- ओझरखेड

No comments:
Post a Comment