सायकल म्हणते, मी आहे ना...!
पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठी सायकल चालवणे सध्या या धावपळीच्या जीवनात गरजेचे बनले आहे. म्हणूनच आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंगचे महत्त्व खूप वाढलेले आहे. लहान्यांपासून वृद्धही सायकल चालवू लागले आहेत. विशेष असे की अशा सायकलवरून जगाची सफर करणारे अनेक विक्रमादित्य होऊन गेले आहेत. विविध खडतर भागातील जागतिक सायकल स्पर्धा जिंकून अनेक मान्यवरांनी सायकलिंगचे विक्रम त्यांच्या नावावर केले आहेत. आणि हे नक्कीच कौतुकास्पद व गौरवशाली आहे.
सध्या तर स्मार्ट सीटीने सार्वजनिक ठिकाणी भाडेतत्वावर सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. व्यायामाचे महत्त्व समजलेल्या व्यक्ती या सायकली चालून व्यायामाचा आनंद घेत आहेत.
अशा या कमी खर्चिक व हितकारक वाहनाचे आत्मकथन जाणून घेताना आमचे विद्यार्थी खूष....
जि.प.प्राथ.शाळा-ओझरखेड, ता. दिंडोरी
वर्ग- 6 वी
विषय-मराठी
उपघटक-सायकल म्हणते,मी आहे ना !
अध्यापन पद्धत - ज्ञानरचनावाद
1) पुर्वज्ञान - ब-याच मुलांच्या घरी सायकल आहे.सायकल खेळ म्हणून चालवतात. सायकल शिकताना आलेल्या गमतीशीर अनुभवांचे कथन.पहिल्या सायकल खरेदीचा आनंद... या सा-या अनुभवावर चर्चा.
2) पुर्वानुभवांशी ज्ञानाची सांगड - मुले कुटुंबियांच्या मदतीसाठी छोटी-मोठी कामे करण्यासाठी सायकलचा वापर करतात.
उदा. दुकानातून वस्तू विकत घेऊन येणे. भाजीपाला आणणे. दुध आणणे. मेडिकल वरून औषध-गोळ्या आणणे इ.
3) ज्ञानाची निर्मिती - सायकल चालवण्याचे फायदे ...
अ) वैयक्तिक फायदे -
1) माफक किंमतीत सायकल मिळते.
2) सायकल चालवण्याने व्यायाम होतो. प्रतिकार शक्ती वाढते. वेगळा व्यायाम करण्याची आवश्यकता नाही.
3) शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.4) मेन्टेनन्स् खर्च अत्यल्प.
5) सायकलीत बिघाड झाला तर हलकी-फुलकी असल्याने ने-आण करणे सोपे होते.
6) पार्किगसाठी जागा कमी लागते.
ब) सामाजिक फायदे -
1) अपघाताचे प्रमाण कमी असते.
2) गर्दीतही सायकल रेटून नेता येते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवत नाही.
3) महत्त्वाचे म्हणजे वायू प्रदुषण होत नाही.
क) राष्ट्रीय फायदे -
1) पेट्रोल व डिझेल या इंधनांची बचत होते.परिणामी देशाचे चलन वाचते.
2) परदेशातून जास्त प्रमाणात इंधन विकत घ्यावे लागत नाही.
स्वाध्यायः-
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
आज वर्गात प्रत्यक्ष सायकल आणल्यावर विद्यार्थ्यांना पाठाचा अंदाज आला. पण विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करताना सायकलच्या भागांची नावे विचारले. तेव्हा एक-एक विद्यार्थ्यांने जे काही नावे सांगितले ते ऐकूण सर्व वर्ग हसून हसून थकला.हिच आजच्या दिवसाची वैशिष्ट्येपूर्ण बाब ठरली...!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
📝 विश्वास पाटोळे
शाळा-ओझरखेड

No comments:
Post a Comment